जगभरात आज मोठ्या उत्साहात मातृदिन साजरा करण्यात आला. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आज मातृदिनी आपल्या आईचे आभार मानले, तर काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आईसारखं दैवत साऱ्या जगतात नाही असं म्हणतात ना…अगदी याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात आई खूप महत्त्वाची असते. बालपणापासून आपली आई नेहमीच आपल्याला खंबीरपणे साथ देते. अभिनेत्री प्रिया बापटने देखील आज मातृदिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

नाटक, मालिका, वेबसीरिज, चित्रपट अशा चारही माध्यांमध्ये आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. अभिनेत्रीचं तिच्या आईबरोबर खूपच घट्ट नातं होतं. काही वर्षांपूर्वी प्रियाच्या आईने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे आज मातृदिनी आईच्या आठवणीत अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

हेही वाचा : चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानिस सध्या काय करते? म्हणाली, “ठाण्याला शिफ्ट होऊन…”

प्रिया बापटची आईसाठी खास पोस्ट

प्रिया लिहिते, “आय मिस यू आई…तुला नेहमी वाटायचं मी गाणं शिकावं…त्यात पुढे जावं. मला आजही आठवतंय की, तू आम्हाला रोज रात्री ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गाणं म्हणून दाखवायचीस. हे खास गाणं फक्त तुझ्यासाठी…मला माहितीये तू जिथे कुठे असशील तिथे माझा आवाज नक्की पोहोचत असेल.”

हेही वाचा : Video : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या मंचावर ‘नाच गं घुमा’! भरत जाधव, अलका कुबल यांचा जबरदस्त डान्स

प्रियाने या व्हिडीओमध्ये तिच्या स्वत:च्या आवाजात खास आईसाठी ‘लुका चुप्पी बहुत हुयी’ हे ‘रंग दे बसंती’ चित्रपटामधलं गाणं गायलं आहे. हे गाणं लता मंगशेकर यांनी गायलं होतं. ‘लुका चुप्पी’ गाणं ऐकताच कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. प्रियाने आज खास मातृदिनी आपल्या आईच्या आठवणीत हे गाणं गायलं आहे.

हेही वाचा : “सर्वात चांगली आई…”, मातृदिनानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला खास व्हिडीओ; जिनिलीया कमेंट करत म्हणाली…

दरम्यान, प्रियाच्या पोस्टवर पूर्वा फडके, समीमा घोगळे, भाग्यश्री लिमये, मनिष पॉल, पल्लवी पाटील अशा कलाकारांनी कमेंट्स करत सुंदर आवाजासाठी तिचं कौतुक केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच प्रिया बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. तिच्या या नव्या प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader