अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत लवकरच ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकानंतर जवळपास १० वर्षांनी दोघेही पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र दिसतील. प्रिया-उमेश गेली १७ ते १८ वर्ष एकमेकांबरोबर आहेत. मराठी कलाविश्वात त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतचं एका मुलाखतीत प्रियाने उमेशबाबत मोठा वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “तो फक्त माझा मुलगा आहे म्हणून नाही तर…”, लेकाच्या कामाबद्दल सुचित्रा बांदेकरांनी केलं स्पष्ट भाष्य, म्हणाल्या…

एका मुलाखतीत प्रियाला विचारण्यात आलं होतं उमेश तुझ्या आयुष्यात नसता तर काय झालं असत? हा प्रश्न ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसला. प्रिया म्हणाली, “मी उमेशशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. पण जर मी उमेशच्या आयुष्यात नसते तर त्याच्या आयुष्यात कटकट कमी असली असती.”

हेही वाचा- “१०३ किलोवरून…”, सिद्धार्थ चांदेकरने पाच महिन्यांत कमी केले वजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “शरीराविषयी आदर…”

प्रिया आणि उमेशची जोडी ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग ५ ऑगस्टला ठाण्यात होणार आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapat talk about importance of umesh kamat in her life in recent interview dpj