मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आजही लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्या दोघांना एकत्र पाहिलं की त्यांचे चाहते त्यांना ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ असे म्हणतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
उमेश कामत आणि प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उमेश आणि प्रिया खूप गोड दिसत आहेत. फोटोत उमेशने प्रियाच्या पोटावर हात ठेवून पोज दिल्यानं नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी त्यांना गुड न्यूज आहे का? असा प्रश्न विचारला आहे. उमेश आणि प्रियाच्या या फोटोवर प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यानेही कमेंट केली आहे. ‘येस येस येस…दादा एक गुड न्यूज आहे का? असा प्रश्न त्याने विचारला आहे. मात्र, उमेशने अद्याप कोणत्याच प्रश्नाला प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रिया आणि उमेशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर दोघेही गेली अनेक वर्ष नाटक,मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तर प्रियाने चित्रपट,आणि वेब सीरिजमध्ये काम करून अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या वेबसिरीजमधील बोल्ड सीन्समुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.