९० च्या दशकातील मराठमोळ्या लोकप्रिय अभिनेत्री व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे या त्यांच्या परखड मतामुळे नेहमी चर्चेत असतात. नाटक, चित्रपट, मालिका आणि राजकारण या सगळ्यांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या प्रिया बेर्डेंनी मराठीतील सध्याच्या कलाकारांच्या वागणुकीविषयी नुकतीच खंत व्यक्त केली. त्या नेमक्या काय म्हणाल्या? जाणून घ्या…
‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ या सोहळ्यानिमित्ताने प्रिया बेर्डे यांनी ‘सकाळ’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना विचारलं गेलं की, पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कलाकारांच्या भेटीगाठी होतात. ही खरी गंमत असते. यावर प्रिया म्हणाल्या, “हो भेटतात. नवीन लोकांचा परिचय होतो. पण अलीकडे आपल्यातल्या मला खूप काही गोष्टी खटकतात. आपणहून बोलल्याशिवाय लोक बोलतंच नाहीत. पूर्वी तसं नव्हतं. “
हेही वाचा – सुबोध भावेने मोबाइलमध्ये बायको मंजिरीचा नंबर मजेशीर नावाने केलाय सेव्ह, कारण सांगत म्हणाला…
“तुम्ही इंडस्ट्रीमधले आहात तर तुम्हाला ओळख करून देण्याची गरज नसते. तर ते मला सांगावं लागतं नमस्कार मी प्रिया बेर्डे वगैरे. मग तेही म्हणणार नमस्कार मी असं असं वगैरे. या सगळ्या गोष्टींची काय गरज असते? मग कधीतरी बघून न बघितल्यासारखं करणं आणि ओळख न देणं अशा खूप गोष्टी अलीकडे वाढल्या आहेत. पण ठीक आहे. हे आता बदललं आहे. अॅटिट्यूड लोकांचा बदलतोय. स्वतःकडे पाहण्याचा आणि लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय. मला आता हे स्वीकारायला पाहिजे. मीही तशा पद्धतीने स्वतःमध्ये छान बदल करून घेतला आहे,” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
पुढे प्रिया म्हणाल्या, “आपली इंडस्ट्री खूप छोटी आहे. याच्यात तुम्ही कुठे अॅटिट्यूड दाखवता. तुम्ही कुठे एखाद्याला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी झगडता. याची गरजच नसते. हे महत्त्व प्रेक्षक आपल्याला देत असतात. त्यांचं प्रेम आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण मोठे होता. पण आपल्या इंडस्ट्रीत असं का वागतात हे मला अजूनपर्यंत कळलं नाहीये. मी तर तीन-चार वेळेला स्वतःहून हाक मारते पण चौथ्या वेळेला फाट्यावर मारते. माणसं जोडणं फार कठीण असतं आणि खूप महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीला बोलून तोडणं सोप असतं.”
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला आवडलं प्रसाद ओकचं आलिशान घर, फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या अलीकडेच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकल्या होत्या. त्यांनी या मालिकेत सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे ही भूमिका साकारली होती.