प्रिया बेर्डे या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांतही काम करुन त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. प्रिया बेर्डे राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आता प्रिया बेर्डे यांच्याकडे पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रिया बेर्डे यांची भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रिया यांची सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनेत्री व लावणी नृत्यागंणा सुरेखा कुडची यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. सुरेखा कुडची यांनी प्रिया बेर्डे यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा>> ‘तू तेव्हा तशी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! चाळीशीतील अनामिका-सौरभची लव्ह स्टोरी व रोमान्समुळे मालिका होती चर्चेत

सुरेखा कुडचींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रिया बेर्डे यांचा फोटो असलेला बॅनर शेअर केलं आहे. या फोटोला त्यांनी “प्रियाताई अभिनंदन…ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…लव्ह यू” असं कॅप्शन दिलं आहे. सुरेखा कुडचींची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या दोनच वर्षात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी ११ फेब्रुवारीला नागपूर येथे भाजपामध्ये प्रवेश केला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya berde joined bjp surekha kudachi shared special post for her kak
Show comments