विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०१८ मध्ये दुसरा भाग आणि २०२२ मध्ये ‘बॉईज’ चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. ‘बॉईज’ मालिकेतील सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा : “रिंकू राजगुरु ‘झिम्मा २’ची मज्जा घालवणार नाही ना?” चाहत्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरची प्रतिक्रिया, म्हणाला…

ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Muramba fame shashank ketkar propose to shivani mundhekar on Aata Hou De Dhingana season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
parineeti chopra and raghav chadha engrossed in ganga aarti video viral
Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ

‘बॉईज’च्या चौथ्या भागात गौरव मोरे, निखिल बने अशा बऱ्याच नवोदित कलाकारांनी काम केलं आहे. याशिवाय ‘बॉईज ४’मध्ये दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनयची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी नुकताच ‘बॉईज ४’ चित्रपट पाहिला. प्रिया बेर्डेंना चित्रपट आणि लेकाचं काम कसं वाटलं? याबद्दल त्यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितलं आहे.

हेही वाचा : “२ वर्ष वडिलांना नोकरी नव्हती अन् आई…”, प्रार्थना बेहेरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली…

प्रिया बेर्डें म्हणतात, “‘बॉईज ४’ हा खूपच धमाल आणि टाइमपास चित्रपट आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना अनेक गोष्टींची जाणीव होईल. कारण, मनोरंजन आणि विनोदाबरोबरच यातून खूप चांगले चिमटे काढण्यात आले आहेत. माझा लेक अभिनयबद्दल सांगायचं झालं, तर त्याचा एक नवीन आणि हटके लूक या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं. अवधूत गुप्तेंची गाणी उत्तमचं आहेत. एकंदर हा चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो.”

हेही वाचा : “माझ्या लैंगिकतेबद्दल सर्वप्रथम…”, करण जोहरने केला शाहरुख खानबद्दल खुलासा; म्हणाला, “तो कायम…”

दरम्यान, ‘बॉईज ४’ चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.