अभिनेता प्रियदर्शन जाधवने मराठी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाशिवाय लेखन आणि दिग्दर्शनातही त्याने उत्तम काम केले आहे. ‘टाईमपास’ चित्रपटातून अभिनेता घराघरांत पोहोचला. प्रियदर्शनने नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ नाटकादरम्यानची कटू आठवण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “देव करो अन् सर्वांना…”, सई ताम्हणकर आणि प्रार्थना बेहरेने गायलं सोनालीसाठी खास गाणं, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

प्रियदर्शन म्हणाला, “‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या नाटकाचा प्रयोग १ जानेवारी २००७ ला नागपूरमध्ये होता. निर्मिती सावंत, निर्माते दिलीप जाधव आणि मी असे आम्ही तिघेही प्रयोगाला विमानाने जाणार होतो. पण, त्या दोघांचे तिकीट वेगळ्या विमानाचे होते आणि मी एकटा जाणार होतो. नाटकाची बस सर्व सामान घेऊन निघाली होती. मी त्या नाटकात रिप्लेसमेंट म्हणून काम करत होतो. ३१ डिसेंबरच्या रात्री मी खूप दारु प्यायलो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळचे ७ वाजताचे माझे विमान चुकले. त्यानंतर मी १० च्या विमानाचे तिकीट बुक केले पण, ते विमान काही कारणास्तव संध्याकाळी ४ पर्यंत उशिरा निघणार होते.”

हेही वाचा : “तीन वर्ष ऑडिशन्स देऊन…”, बॉलीवूड अभिनेत्याला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “बायकोचे दागिने, राहते घर…”

अभिनेता पुढे म्हणाला, “४ वाजता विमान पकडून मी ५ ते ५.३० च्या दरम्यान नागपूरात उतरलो पण, तिथून पुढचा प्रवास जवळपास २५० किलोमीटरचा होता. शेवटी काहीच होऊ शकले नाही, माझा प्रयोग चुकल्यामुळे तिथल्या एका अशोक नावाच्या म्युझिक ऑपरेटरने माझी भूमिका केली. त्यानंतर साहजिकच मला नाटकातून काढून टाकण्यात आले.”

हेही वाचा : “२० दिवस एकच पोशाख, पाण्यासाठी भीक अन् व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”, ‘तारक मेहता’ फेम जेनिफर मिस्त्रीचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

“या एका गोष्टीमुळे मी आयुष्यात खूप काही शिकलो. पुन्हा असला प्रकार माझ्याकडून कधीच घडला नाही. माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली याबद्दल फार वाईट वाटले. ही आठवण आयुष्यातून पुसून टाकावीशी वाटते.” असे प्रियदर्शनने सांगितले. दरम्यान, प्रियदर्शनने आजवर ‘नवा गडी नवं राज्य’, ‘मिस्टर अँड मिसेस’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ अशी बरीच नाटकं केली. लवकरच त्याचा ‘काटा किर्रर्रर्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyadarshan jadhav was fired from the one drama the actor reveals story sva 00
Show comments