पुण्यातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचं मागच्या आठवड्यात रामायणातील व्यक्तिरेखा असलेलं नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं होतं. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याबाबत अभाविपंकडून तक्रार देण्यात आली. याप्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरने दुसऱ्यांदा केलेली पोस्ट चर्चेत आहे.

ही घटना घडल्यानंतर प्रियदर्शिनीने त्याचा निषेध नोंदवला होता. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीनंतर प्रियदर्शिनीने एक पोस्ट रिपोस्ट करत त्यावर प्रतिक्रिया दिली. ज्यात आपल्याला निषेधाच्या पोस्टमुळे धमक्या आल्याचं तिने म्हटलं आहे. पहिल्या पोस्टमध्ये “ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध…”, अशी स्टोरी तिने पोस्ट केली होती.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
priyadarshini Indalkar post 1
प्रियदर्शिनीने केलेली निषेधाची पोस्ट

आता प्रियदर्शिनीने स्टोरीला लेखक व अभिनेता हितेश पोरजेने लिहिलेली पोस्ट शेअर करत लिहिलं, “ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले ३-४ दिवस मला अनेक भयंकर मेसेज, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. ही पोस्ट कदाचित काही गोष्टी सोप्या करून सांगेल.”

priyadarshini Indalkar post
प्रियदर्शिनीने केलेली आताची पोस्ट

पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?

प्रियदर्शिनीने शेअर केलेली पोस्ट नेमकी काय?

“मी काही ललित कला केंद्राचा विद्यार्थी नाही. नाटक अथवा फिल्मशी संबंधित कुठल्याच इंस्टिट्यूटचा पार्ट नाही. पण गेल्या आठवड्यात झालेल्या ललित कला केंद्राच्या वादानिमित्त काही गोष्टी मनात आल्या त्या इथे मांडतोय.

ललित कला केंद्राच्या अनेक विद्यार्थ्यांना मी जवळून ओळखतो. अगदी आत्ताच्या विद्यार्थ्यांपासून ते हिंदी-मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एस्टॅब्लिश्ड ॲक्टर्सपर्यंत. विदर्भापासून ते कोकणापर्यंतच्या कित्येक छोट्या छोट्या गावांतून अनेक मुलं-मुली इथे शिकायला येतात. पुणे शहरात आपसूकपणे अंगावर येणारे सामाजिक-सांस्कृतिक गुंते मोकळे करत कष्टाने नाटकं उभी करतात, प्रयोग करतात. लोककला आणि पाश्चात्य नाट्यकलेचे प्रशिक्षण घेत खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात.

संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको.

आता सगळ्यात मोठा मुद्दा. प्रकरण इतकं मोठं झाल्यावर पुढच्या वर्षी एखादा पालक आपल्या मुला-मुलीला ललितमध्ये प्रवेश घ्यायला लगेचंच परवानगी देईल का? नाही दिली परवानगी तर नुकसान कुणाचं? तर अगदी आत्मियतेने नाटक-अभिनय शिकू पाहणाऱ्या निमशहरी, खेड्यातल्या मुलांचं. नाटक-फिल्मद्वारे जातीय आणि धार्मिक वर्चस्वाला आव्हान देण्याची गरज असतांना ही पॅरेलेल सोशल सेंसरशिप आपली मुळं आतवर रुजवणार. हे असंच वाढत राहिलं तर नुकसान कुणाचं!? तर आपल्याच समृद्ध अशा नाटक आणि सिनेमाच्या वारश्याचं. एकदा फक्त एफटीआयआय वर हल्ला करणाऱ्यांचा व्हिडिओ बघा. त्यातली मुलं बघा. पुण्याच्या आसपासची सगळी बहुजनांची पोरं. एकदा फक्त ललित कला केंद्रात तोडफोड करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांची नावं वाचा. धर्म आणि संस्कृतीची डौलदार पालखी वाहायची कुणी आणि तिच्या आत बसून गंमत बघायची इतरांनीच!,” अशी पोस्ट हितेश पोरजेने केली आहे.