Priyanka Chopra Marathi Movie: प्रियांका चोप्राने मराठी प्रेक्षकांसाठी मोठी घोषणा केली आहे. तिची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्माती प्रियांका चोप्रा आहे. तिच्याबरोबरच राजश्री एंटरटेनमेंट व कोठारे व्हिजन प्रा. लि. हेही ‘पाणी’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या ‘पाणी’मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Priyanka Chopra Marathi film Paani released on OTT
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन

वडिलांची ‘ती’ अट आणि अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी केलं लग्न, बिग बींनी स्वतःच केला खुलासा

या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक प्रियांका चोप्रा जोनस म्हणाली, ”’पाणी’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. या चित्रपटात अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळण्यात येणार आहे. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.”

pani movie release date
‘पाणी’ चित्रपटाचे पोस्टर

“पर्पल पेबल पिक्चर्स नेहमीच अनोख्या, अविश्वसनीय आणि भारतातील प्रत्येक प्रदेशातील स्थानिक कथांना प्रोत्साहन देते. ‘पाणी’ हे मनोरंजन आणि प्रेरणादायी चित्रपटाचे ज्वलंत उदाहरण आहे. आदिनाथचे दिग्दर्शन खास आहे. या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार. माझा चौथा मराठी चित्रपट मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासारख्या दोन बलशाली संस्थेसोबत घेऊन येत आहे. याचा मला आनंद आहे,’’ असं प्रियांका म्हणाली.

अरबाज अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! आदळआपट करत काढला राग; नेटकरी म्हणाले, “बाई किती ते नाटक…”

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. “तुमच्यासाठी एक खास बातमी! आमचा आगामी मराठी चित्रपट ‘पाणी’, १८ ऑक्टोबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. तर लवकरच भेटू.. चित्रपटगृहात,” असं कॅप्शन प्रियांकाने व्हिडीओला दिलं आहे.

” प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेनमेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या चित्रपटाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो. ‘पाणी’ लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांसोबत राहील,” असं दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणाला.

Story img Loader