‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक मानला जातो. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतंच निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीरच्या दुसर्‍या भागाची घोषणा केली. काहीच दिवसांपूर्वी मंगेश यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यात ते प्रवीण तरडे यांच्यासह जेजुरीमधील खंडोबाचं दर्शन घेताना दिसले. यावेळी त्यांच्या हातात धर्मवीर २ चित्रपटाचे पहिलं पोस्टरही पाहायला मिळाले होते. आता लवकरच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

What Uddhav Thackeray Said About Rahul Gandhi?
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलाच नाही, भाजपा खोटं नरेटिव्ह…”
Savitribai Khanolkar Marathi name for designing the Param Vir Chakra award
सावित्रीबाई खानोलकर… परमवीर चक्र पुरस्काराचं डिझाईन करणारं मराठमोळं नाव
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
Fact Check :Dr Babasaheb Ambedkar Statue Broken By Muslims Group
Fact Check: “मुस्लिमांकडून आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, दलितांना मारहाण..”, चर्चेतील फोटोत मोठं सत्य लपवण्याचा प्रयत्न
p l deshpande social political ideology Purushottam Laxman Deshpande Marathi writer
हशा-टाळ्या पलीकडचे पुलं! राजकारण आणि समाजकारणात पु. ल. देशपांडेंनी काय भूमिका घेतली होती?
MP Chirag Paswan Leaked Video
कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या लीक क्लिपमुळे खळबळ, मोदींवरही होतेय टीका! Video मध्ये काय व कधी घडलं?
Sane Guruji Death anniversary Freedom fighter pandharpur mandir pravesh
साने गुरुजी स्मृतिदिन : मातृहृदयी की बंडखोर? ‘रडवे’ साहित्यिक की आग्रही धर्मसुधारक?
Loksatta lokrang Ratnagiri Palgad Melawa organized on the 478th Memorial Day of Sane Guruji
सेनानी साने गुरुजी

आणखी वाचा : ‘गदर २’च्या पाठोपाठ सनी देओलच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटाचा येणार सीक्वल; लवकरच होणार घोषणा

चित्रपटाची टॅगलाइन ही ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी असल्याने बरेच लोक संभ्रमात पडले की नेमकी कोणत्या साहेबांची गोष्ट यात पाहायला मिळणार. यावर नुकतंच मंगेश देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘एबीपी माझा’शी संवाद साधतांना मंगेश देसाई म्हणाले, “साधारण नोव्हेंबरपर्यंत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोघेही आपलेच साहेब आहेत. त्यापैकी दिघे साहेबांबद्दल काही गोष्टी पहिल्या भागात आपण पाहिल्या. या दोन्ही साहेबांचा ‘हिंदुत्व’ हाच अजेंडा होता त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट धर्मवीर २ मध्ये पाहायला मिळणार आहे.”

‘धर्मवीर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याचा संबंध थेट चित्रपटाशी काही लोकांनी जोडल्याने याबद्दल गैरसमज निर्माण झाले. आता मात्र या दुसऱ्या भागामागची भूमिका मंगेश देसाई यांनी स्पष्ट केली असल्याने शंकेला वाव नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. तर मंगेश देसाई हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आता या चित्रपटात कोण कोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र ‘धर्मवीर २’च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.