अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) ‘जबरदस्त’ या मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदापर्ण केले. त्याने आजवर ‘सासूचं स्वयंवर’, ‘ती आणि ती’, ‘बापमाणूस’ काम केले. मराठी बिग बॉसमधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याचे आता नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या गाण्यात त्याच्याबरोबर अभिनेत्री पूजा राठोड दिसणार आहे. ‘बायडी’ असे नव्या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचा प्रोमो आला असून पुष्कर आणि पूजा राठोडने हा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचा पोस्टर आणि प्रोमो शेअर केला आहे. ‘बायडी’ या गाण्याच्या पोस्टरमध्ये अभिनेता पुष्कर जोग रिक्षावाल्याच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर अभिनेत्री पूजा राठोड ही सालस रूपात गावाकडच्या मुलीच्या गेटअप मध्ये दिसली आहे. त्यामुळे गाण्याच्या पोस्टरने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा…‘व्हेंटिलेटर’ फेम दिग्दर्शकाच्या मराठी सिनेमाची घोषणा, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर करणार पदार्पण

तर ‘बायडी’ गाण्याच्या प्रोमोमध्ये पुष्कर जोग सायकलवरून पेपर टाकताना दाखवला आहे यासह तो सायकलवरून उतरून एका हातात सायकल पकडत मुलीचा पाठलाग करताना दाखवला आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तो प्रेमात असल्याचे दिसत असून प्रोमोच्या शेवटी गायिका ‘तुझी बायडी’ असे म्हणते.

पुष्करने या आधी बिग बॉस मराठी हा रियालिटी शो तसेच ‘तू तू मै मै’, ‘वचन दे तू मला’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या टेलिव्हिजन मालिका आणि ‘वेल डन बेबी’, ‘ती आणि ती’, ‘मुसाफिरा’ असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तर अभिनेत्री पूजा राठोड हिने ‘अल्याड पल्याड’ चित्रपट आणि ‘ ‘सोनेरो भुरिया’, ‘सोकेवलो साडो’, ‘नीलो कालो फेटिया’ अशी बरीच बंजारा गाणी केली आहेत.

हेही वाचा…Video : प्रिय स्वामी…; पूजा सावंतने देवाला लिहिलं पत्र! मागितली ‘ही’ खास गोष्ट; म्हणाली, “सध्या माझा पत्ता…”

‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ या गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. अभिजीत दाणी यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. प्रितेश मावळेने या गाण्याला संगीत दिले आहे. ‘बायडी’ गाण्याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar jog and pooja rathod team up for new song baydi psg