Pushkar Jog Buys New Ranger Rover Car : मराठी कलाविश्वात ‘जबरदस्त’ चित्रपटातून एन्ट्री घेणाऱ्या पुष्कर जोगने त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे. या नवीन वर्षात अनेक कलाकारांनी नवीन घरं, गाड्या खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. आता या यादीत पुष्करचं नाव सुद्धा जोडलं गेलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुष्करने लाडक्या लेकीला दिलेल्या शब्दानुसार ही नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्याच्या लेकीचं नाव फेलिशा असं आहे. फेलिशाने दुबईत असताना, “डड्डा तू रेंज रोव्हर केव्हा घेणार?” असा प्रश्न पुष्करला विचारला होता. अखेर आता अभिनेत्याचा घरी रेंज रोव्हर या आलिशान गाडीचं आगमन झालेलं आहे. नव्या गाडीची पहिली झलक अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

पुष्कर जोगने पांढऱ्या रंगाची सुंदर अशी रेंज रोव्हर गाडी खरेदी केली आहे. त्याची लेक फेलिशाने या गाडीची पूजा केली. या दोघांनी मिळून गाडीवरचा लाल कपडा बाजूला करत नव्या गाडीची पहिली झलक सर्वांना दाखवली.

अभिनेता हा व्हिडीओ शेअर करत लिहितो, “आई आणि बाबा यांचा आशीर्वाद… अमोल दादा थँक्स… फेलिशाने मला दुबईत विचारलं होतं, डड्डा तू रेंज रोव्हर गाडी केव्हा घेणार? माय जान, माय एंजेल ही गाडी तुझ्यासाठी आहे. तळटीप- होय मराठी कलाकार सुद्धा रेंज रोव्हर कार खरेदी करू शकतात.”

पुष्कर जोगच्या पोस्टवर रुपाली भोसले, मंदार जाधव, भूषण पाटील, बालकलाकार केया यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पुष्करने गाडीची पूजा करून झाल्यावर आपल्या लेकीसह या नव्या गाडीबरोबर फोटोशूट सुद्धा केलं. सध्या सिनेविश्वातून पुष्करवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, अभिनेता पुष्कर जोगच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही महिन्यांपूर्वीच तो ‘दि एआय धर्मा स्टोरी’ या सिनेमात झळकला होता. याशिवाय येत्या काळात पुष्करचे अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पुष्कर आणि हेमल इंगळेची प्रमुख भूमिका असलेला ‘हार्दिक शुभेच्छा’ हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar jog buys new range rover car and fulfills his daughter wish shares video sva 00