“तरस नहीं आया…”, पुष्कर जोगने ‘या’ अभिनेत्रीसह केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

#PushkarJog #tarasnahiaayatujhko #munjya #dance #dancereels #viralvideoシ #LatestNews #entertainmentnews

अभिनेता पुष्कर जोग अनेकदा चर्चेत असतो. पुष्कर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच पुष्करने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पुष्कर आणि ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

शर्वरी वाघ अभिनीत ‘मुंज्या’ या चित्रपटातील ‘तरस नही आया तुझको’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. या व्हिडीओवर इनफ्लूएंसर्ससह अनेक कलाकारदेखील थिरकताना दिसतायत. आता पुष्कर आणि जान्हवी या गाण्यावर थिरकले आहेत. दोघांनीही या गाण्यासाठी मॅचिंग आउटफिटची निवड केली आहे. या व्हिडीओत पुष्करने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे तर त्यावर पोपटी रंगाचं जॅकेट घातलं आहे. तर अभिनेत्रीनेदेखील पोपटी रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर स्लीवलेस ब्लाऊज परिधान केलं आहे.

हेही वाचा… अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बीबरची भारतात एन्ट्री, जगप्रसिद्ध गायक घेणार ‘इतक्या’ कोटींचं मानधन!

हटके डान्स स्टेप करत पुष्करने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “या ट्रेंडसाठी थोडा उशीर झाला आहे. जान्हवीबरोबर डान्स करताना आनंद झाला. डान्स करणं म्हणजे एकप्रकारची थेरेपीच आहे. तसेच आदित्य सरपोतदार आणि संपूर्ण टीमला ‘मुंज्या’च्या मोठ्या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा.” असं कॅप्शन पुष्करने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… हिना खानने केस कापताच अभिनेत्रीच्या आईचे अश्रू अनावर, कर्करोगाचं निदान होताच घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “मला हा मानसिक त्रास…”

पुष्कर जोग आणि जान्हवी किल्लेकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही खूप चांगले डान्स आहात” तर दुसर्‍याने “एक नंबर” अशी कमेंट केली. अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा: “तो तुम्हाला कधीही सोडणार…”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, म्हणाली…

दरम्यान, पुष्कर जोगच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, पुष्कर शेवटचा ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच झळकला होता. या चित्रपटात पुष्करसह, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर, दिशा परदेशी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar jog dance with this marathi actress on munjya song taras nahi aaya tujhko video viral dvr