The AI-Dharma Story Trailer: एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर जगभरात वाढत आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, त्याचबरोबर तोटेही आहेत. यावर आधारित एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे नाव ‘द एआय धर्मा स्टोरी’ आहे.

वडील-मुलीचं भावनिक नातं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘द एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक क्षण या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा आहे. पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा- “गरीब सूरजला जिंकवून माझ्यावर अन्याय”, मराठी अभिनेत्रीचं मोठं विधान; भावुक होत म्हणाली, “२४ वर्षांपासून या इंडस्ट्रीत…”

ट्रेलरमध्ये एआयच्या साहाय्याने फेक व्हिडीओ बनवल्याबद्दल अरविंद धर्माधिकारीच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केल्याचे दिसत असून त्यांच्याकडे धमकावून पैशांची मागणी केली जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? यात धर्मा कसा अडकतोय? त्याच्या मुलीची सुटका होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहेत.

हेही वाचा- Bigg Boss Marathi: जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

पुष्कर जोग याने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. यावेळी नात्याला तंत्रज्ञानाची जोड लाभली असल्याने या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

मराठी चित्रपटाला थोडा हॅालीवूड टच देण्याचा प्रयत्न – पुष्कर जोग

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, “हल्ली सगळीकडे एआयचे तंत्रज्ञान फोफावतेय. ते जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याचे तोटेही आहेत. याच जाळ्यात अडकलेल्या वडिलांची ही कहाणी आहे. प्रत्येक वळणावर यातील सस्पेन्स वाढणार आहे. मराठी चित्रपटाला थोडा हॅालीवूड टच देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. यात अनेक हॅालीवूड ॲक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतील. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्नही प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील.’’