मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या एकापेक्षा एक दमदार स्टारकास्ट असणारे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. परंतु, यातील अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने संबंधित चित्रपटांना त्याचा चांगलाच फटका बसल्याचा दावा काही निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. येत्या नवीन वर्षात सुद्धा अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुष्कर जोग आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मुसाफिरा’ हा चित्रपट पुढील वर्षी २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्ट लॉन्च करण्यात आलं. पण, याच दिवशी आणखी एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि तो म्हणजे ‘श्रीदेवी प्रसन्न’. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत आहेत. दोन्ही चित्रपटांच्या सारख्या तारखांमुळे पुन्हा एकदा याचा मराठी सिनेक्षेत्राला फटका बसणार असं स्पष्ट मत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत पुष्कर जोग यांने मांडलं आहे.

हेही वाचा : “ती मालिकेत राहील किंवा मी”, ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्ध-संजनामध्ये होते टोकाचे वाद; म्हणाले, “आम्ही दोघं…”

पुष्कर जोग लिहितो, “आम्ही ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख आधीच ठरवली होती आणि या (श्रीदेवी प्रसन्न) चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज जाहीर केली. निर्माते एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत का? एक फोन करा…मेसेज करा…पण यातंल काहीच करत नाहीत! बॉक्स ऑफिस क्लॅश होऊ नये म्हणून मी ३ महिने आधीच चित्रपटाची घोषणा केली होती. तरीही असं होणं हे अजिबात योग्य नाही. कृपया, तुमची रिलीज तारीख आधी किंवा पुढे शिफ्ट करा ही नम्र विनंती! या आधीच्या चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा असंच झालंय यामुळे कोणालाच फायदा होत नाही.”

हेही वाचा : “हसवतात, रडवतात अन्…”, अंकुश चौधरीने पहिल्याच दिवशी पाहिला ‘झिम्मा २’! शेअर केलेली पोस्ट चर्चेत

पुष्कर जोगची पोस्ट

पुष्करने या पोस्टबरोबर सिद्धार्थ-सईच्या चित्रपटाची २ फेब्रुवारी ही तारीख दर्शवणारं पहिलं पोस्टर सुद्धा शेअर केलं आहे. दरम्यान, यापूर्वी पुष्करला ‘बापमाणूस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी सुद्धा असाच काहीसा अनुभव आला होता. त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने त्याला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar jog shares angry post on marathi producers as box office date clash between two movies sva 00