अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपीर्वीच ‘३६ गुण’ या चित्रपटाची घोषणा झाली होती. चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. याच चित्रपटात पुष्कर हटके भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात येणार नवा ट्विस्ट, होणार कतरिना कैफची एंट्री आणि…

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

‘३६ गुण’ या चित्रपटात पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. पुष्कर ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर सांगतो की, “‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा.”

हेही वाचा : “मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद….” प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.