राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. पण आता त्यांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांना खटकला आहे.

राहुल देशपांडे त्यांच्या ‘वसंतोत्सव’ कार्यक्रमाच्या दौऱ्यानिमित्त सध्या अमेरिकेला गेले आहेत. महिनाभर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये ते ‘वसंतोत्सव’चे कार्यक्रम करणार आहेत. त्याबद्दलचे अपडेट्स, अमेरिका दौऱ्यामधील गमतीजमती ते सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत आहेत. असाच एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

आणखी वाचा : सोबर इंटिरिअर, क्लासी लूक…; ‘अशी’ आहे राहुल देशपांडे यांची नवी कोरी आलिशान मर्सिडिज, पाहा खास झलक

राहुल देशपांडेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्क्रॅम्बल्ड एग बनवताना दिसत आहेत. ते बनवणं ते खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडीओत ते गमतीत ते म्हणाले, “स्क्रॅम्बल्ड एग कसं बनवू नये हा व्हिडीओ मी बनवत आहे.” तर अखेरीस त्यांनी बनवलेली ही डिश चविष्ट होते आणि त्यांनाही ती खूप आवडते. पण राहुल देशपांडे यांनी अंड्याची डिश बनवली आणि खाल्ली म्हणून आता नेटकरी त्यांना ट्रोल करू लागले आहेत.

हेही वाचा : “भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

राहुल देशपांडे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतानाच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “ब्राह्मण फक्त नावालाच का? मी चाहता होतो तुमचा पण आता नाही.” तर दुसरा म्हणाला, “मी तुम्हाला अनफॉलो करत आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “तुमच्या आवाजात साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते…! प्रत्येक पंढरीचा वारकरी तुम्हाला देव मानतो…! लहान तोंडी मोठा घास, माफ करा सर पण, आपल्या सारख्या व्यक्तीला हे शोभा देत नाही.” आणखी एकाने लिहिलं, “देशपांडे? काय दाखवता लोकांना तुम्ही? मागे पण ते नाना पाटेकरांच्या फार्महाऊसमधील व्हिडीओ शेअर करून हाडे दाखवली होती. एखाद्या चांगल्या गायकाकडून लोकांना ह्या अपेक्षा नसतात. आणि महत्वाचं लोकांच्या कमेंट वाचा.” एकीकडे राहुल देशपांडेंच्या या व्हिडीओमुळे नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे.

Story img Loader