Marathi Movie Amaltash : लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सुरेल आवाजात अनेक गाणी गायली आहे. आपल्या गाण्यांमुळे अनेक रसिक-प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. गायनाव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका करणारे राहुल देशपांडे यांनी ‘अमलताश’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अमलताश’ हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता नऊ महिन्यांनी या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट मोफत व घरबसल्या पाहता येणार आहे. राहुल देशपांडे व चित्रपटाच्या टीमने ‘अमलताश’ हा चित्रपट ओटीटीवर नाही तर युट्यूबवर प्रदर्शित केला आहे. तुम्हाला राहुल देशपांडे यांच्या युट्यू चॅनलवर हा चित्रपट अॅड-फ्री पाहता येईल. ही चित्रपट आवडल्यास देणगी देण्याचं आवाहन निर्मात्यांनी केलं आहे.

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

अमलताश चित्रपटाचे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या ‘अमलताश’ या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! ‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर-श्रेया डफळापुरकर अडकले लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो आला समोर

हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाते. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी येते, जिला संगीताची आवड असते. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे ‘त्या’ कॅनेडिअन मुलीशी सूर जुळतात का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेते, हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतं.