Raj Thackeray and Bharat Jadhav : मराठी कलाविश्वातील सुपरस्टार अभिनेते म्हणून भरत जाधव यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी असंख्य नाटक व चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ हे नाटक रंगभूमीवर सर्वात जास्त गाजलं… आज २२ वर्षांनी देखील या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल असतात. काही प्रेक्षकांनी तर हे नाटक ५ ते ६ वेळा देखील पाहिलेलं आहे. अशा या एव्हरग्रीन नाटकाचा नुकताच ४ हजार ४४४ वा प्रयोग पार पडला. यानिमित्ताने नाटकाच्या प्रयोगाआधी भरत जाधव यांचं कौतुक करण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे, राज ठाकरे ( Raj Thackeray ), अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव हे मान्यवर उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी यावेळी भरत जाधव यांच्याविषयी बोलताना म्हणाले, “मी आता भरत जाधवला सांगितलं, सगळे सांगतात दहा हजार प्रयोग पूर्ण झाले पाहिजेत…म्हणजे हे नाटक सोडून आयुष्यात दुसरं काहीच करू नकोस असं ते सांगत आहेत पण, अजून बऱ्याच गोष्टी त्याला करायच्या आहेत.” यानंतर सभागृहात एकच हशा पिकतो.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : पहिल्यांदाच दिसणार सूरज चव्हाणचं रौद्ररुप! थेट अरबाजशी घेणार पंगा; म्हणाला, “त्याला हाणलं…”

काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे ( Raj Thackeray ) पुढे म्हणाले, “आज ‘सही रे सही’ नाटकाचा ४ हजार ४४४ प्रयोग भरत करतोय…आज सगळ्यांनी तुझं कौतुक केलं पण, मी माझंही भाग्य समजतो की, आज व्यासपीठावर उपस्थित असलेले हे सगळे कलाकार मला आयुष्यात मित्र म्हणून लाभले. या सगळ्या लोकांकडून मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एवढं यश पाहिल्यावर देखील जमिनीवर कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठेही दिसलं नाही. हे ‘सही रे सही’ नाटक मी अनेक वेळा पाहिलंय…केदार शिंदे म्हणाले पाच वेळा पाहिलंय…पण, कदाचित त्याच्याही जास्तवेळा मी हे नाटक पाहिलंय. या नाटकात भरतने केलेलं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे ती खरंच वेगळी आहे. त्यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते, मनोरंजनाची इतर काही साधनं नव्हती. तेव्हा फक्त चित्रपट आणि नाटक ही दोनच मनोरंजनाची साधनं होती. पण, आजच्या घडीला मनोरंजनाची असंख्य साधनं उपलब्ध आहेत आणि असे अनेक पर्याय उपलब्ध असूनही भरतचं नाटक हाऊसफुल्ल असणं ही सोपी गोष्ट नाहीये.”

हेही वाचा : Stree 2: श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ची ग्रँड ओपनिंग! ‘फायटर’, ‘कल्की’ला टाकलं मागे; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

raj thackeray
राज ठाकरे ( Raj Thackeray ) व भरत जाधव ( फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव )

“लोक मनोरंजनासाठी मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी नाकारून भरतचं नाटक बघायला येतात…ही त्याची सर्वात मोठी कमाई आहे. इतक्या प्रयोगांनंतर ज्यावेळी नाटक संपतं आणि जेव्हा भरतला भेटायला प्रेक्षक येतात आणि ते म्हणतात आम्हाला फोटो पाहिजे…तेव्हा तो सर्वांबरोबर फोटो काढतो. आता आजचा प्रयोग संपल्यावर सुद्धा तुम्ही सगळेजण याल आणि तो प्रत्येकाबरोबर फोटो काढेल. २२ वर्षांपूर्वी केदार शिंदेंनी ही सुंदर कलाकृती रंगभूमीवर आणली… हे ‘सही रे सही’ नाटक म्हणजे मराठीतला ‘शोले’ आहे. भरतच्या आई-वडिलांनी एवढं सुंदर नाव ठेवलंय त्याचं की, इतके प्रयोग करूनही ज्यांचं मन भरत नाही तो भरत जाधव! आज भरत, केदार आणि अकुंश या त्रिकुटाला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.” असं मत मांडत राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी भरत जाधव यांना पुढील प्रयोगांसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Story img Loader