ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या गेली अनेक वर्षं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मनोरंजनसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “पोरगी चिकणी आहे…”; वंदना गुप्तेंना पहिल्यांदा पाहताच पती शिरीष यांच्या तोंडातून निघालेलं ‘हे’ वाक्य, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

नुकतंच वंदना गुप्ते यांनी खुपते तिथं गुप्ते कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी करिअरबरोबर खासगी आय़ुष्यातील अनेक घटनांचा उलघडा केला आहे. वंदना गुप्ते यांचे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याशी खूप जुने संबंध आहेत. गेली अनेक वर्षं ते एकमेकांना ओळखतात. दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरं आहेत, त्यामुळे अनेकदा त्यांचं भेटणं होत असतं. दरम्यान वंदना गुप्ते यांनी राज ठाकरेंशी निगडीत एक किस्सा सांगितला आहे.

वंदना गुप्ते म्हणाल्या, “चार-पाच वर्षांपूर्वीच गोष्ट आहे. मी नवीन गाडी घेऊन गल्लीतून येत होते आणि राज ठाकरे नेमकं त्या गल्लीतून फेऱ्या मारत होता. नवीन गाडीला सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतं ते मी काढलं नव्हतं. राजने हे बघताच माझी गाडी थांबवली आणि काच खाली करुन फ्लॅपवरच प्लास्टिक फाडलं. त्यामुळे मला बाकीचं कव्हर काढावचं लागलं. मी त्याला म्हणालेले मी घरी जाते आणि काढते पण तो म्हणाला इथे मराठी माणूस दिसतो. कशाला हवं ते वाचवायचं आहे का तुला कुठं डाग पडेल का म्हणत त्यांनी प्लास्टिक कव्हर फाडलं.”

हेही वाचा-“बायकांप्रमाणे प्रत्येक पुरुषाने…”, राज ठाकरेंनी दिली ‘बाईपण भारी देवा’बद्दल प्रतिक्रिया; केदार शिंदेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

दरम्यान वंदना गुप्ते यांचा बाईपण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. चार आठवड्यात या चित्रपटाने ८३.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. स्त्रीयांवर आधारित या चित्रपटाचे पुरुष वर्गाकडून कौतुक होताना दिसत आहे

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray tearing the plastic cover of vandana guptes new car dpj