Fandry Fame Rajeshwari Kharat And Somnath Awaghade : ‘फँड्री’ चित्रपट बरोबर १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवखे कलाकार झळकले होते. या चित्रपटात दोघांनी जब्या व शालूची भूमिका साकारली होती. ‘फँड्री’ने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता हे दोन्ही कलाकार मोठे झाले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर देखील राजेश्वरी आणि सोमनाथ हे दोघं कायम सक्रिय असतात.

‘फँड्री’मधली जब्या आणि शालूची जोडी प्रेक्षकांच्या एवढी पसंतीस उतरली की, आजही सोमनाथ आणि राजेश्वरीचा उल्लेख सर्वत्र चित्रपटातील भूमिकेच्या नावानेच केला जातो. नुकताच राजेश्वरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सर्वत्र चर्चेत आला आहे. हा फोटो लग्नमंडपातील आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी आणि सोमनाथ डोक्याला मुंडावळ्या बांधून पाटावर बसल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे दोघंही गुपचूप लग्नबंधनात अडकल्याच्या चर्चांना उधाण आहे.

हेही वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा नवीन चित्रपट; झळकणार ‘हे’ कलाकार, नाव अन् पोस्टर आलं समोर

राजेश्वरी आणि सोमनाथने याआधी एकत्र फोटो शेअर केल्यावर चाहते नेहमीच “लवकर लग्न करा वगैरे” असे सल्ले त्यांना द्यायचे. आता राजेश्वरीने थेट लग्नाच्या मंडपातील फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने याला “सर सुखाची श्रावणी…” हे गाणं लावलं आहे. मात्र, कॅप्शनमध्ये कसलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे दोघांचं खरंच लग्न आहे की, आगामी नव्या प्रोजेक्ट्ससाठी यांनी चाहत्यांची फिरकी घेत दिशाभूल केलीये हे अद्याप समोर आलेलं नाही.

राजेश्वरीने ( Rajeshwari Kharat ) या फोटोत हळदी रंगाची साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा असा लूक केला आहे. तर, सोमनाथने सदरा घालून, डोक्यावर टोपी, कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत. त्यामुळे या दोघांनी लग्नगाठ बांधल्याच्या चर्चा सुरू आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : तब्बल ११ वर्षांचं प्रेम, प्राजक्ताची साथ ते लग्न! पृथ्वीक प्रतापने लग्नाबद्दल स्वत:च केला खुलासा; म्हणाला, “२०१३ पासून…”

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

“हे कधी झालं…”, “भाऊ चिमटभर राख भेटेल का मला पण”, “शेवटी जब्याला शालू भेटलीच…”, “जब्या शालूचं प्रेम सफल झालं. हळदीला बोलावलं नाही जब्या तू…”, “काळ्या चिमणीची राख मिळाली वाटतं”, “काळ्या चिमणीच्या राखेने काम केलं शालू झाली की जब्याची” अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोवर केल्या आहेत.

राजेश्वरीच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ( Rajeshwari Kharat )
राजेश्वरीच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ( Rajeshwari Kharat )

दरम्यान, राजेश्वरी ( Rajeshwari Kharat ) आणि सोमनाथ या दोघांचा फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. आता दोघंही खरंच लग्नबंधनात अडकले आहेत की, ते नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार याचा लवकरच उलगडा होईल.