मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पती प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांच गेल्याच वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सीमा देव आजारीच होत्या. रमेश आणि सीमा देव सिनेसृष्टीतील आदर्श जोडप मानलं जायचं. २०१३ मध्ये त्यांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. एका मुलाखतीत रमेश देव यांनी सीमा यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा ऐकून सीमा देव यांना रडू कोसळले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- रमेश देव-सीमा देव आणि त्यांची अजरामर प्रेमकहाणी!

एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना रमेश देव खूप भावूक झाले होते. ते म्हणालेले. “लग्नाची ५३ वर्ष आणि त्याआधीची चार ते पाच वर्ष आपण एकमेकांना ओळखत आहोत. इतकी वर्ष तू मला साथ दिलीस. आता माझी एक इच्छा पूर्ण कर. मी ९३ वर्षाचा आहे. माझी एकच इच्छा आहे की, माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा. माझी एवढी इच्छा पूर्ण कर.

हेही वाचा- सुभग दर्शनाचं दुसरं नाव ‘सीमा‌‌’!

रमेश देव यांचे हे बोल ऐकून सीमा देव यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्यांना धीर देत असताना रमेश देव यांचेही डोळे पाणावले होते. या जोडप्यामधलं प्रेम आणि एकमेकांबद्दल असणारा आदर अनेकांना प्रेरणा देणारं होतं. रमेश देव यांचं निधन मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालं. तर आज सीमा देव यांची प्राणज्योत आज मालवली. मात्र त्यांची प्रेमकहाणी, त्यांनी अभिनयात घालून दिलेला आदर्श हा येणाऱ्या पिढ्यांना शिकवण देणारा असेल यात काहीही शंका नाही.