Ratan Tata Passes Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशसेवा, साधं राहणीमान आणि सामाजिक जाणीवा जपणारे उद्योगपती म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आपण या समाजाचं देणं लागतो या विचारातून रतन टाटांनी समाजिक कार्यात मोठं योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यावर सगळेच हळहळले आहेत. सामान्य लोकांपासून, राजकीय क्षेत्रातील मान्यवर ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे.

कुशल बद्रिके, सिद्धार्थ चांदेकर, प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन, सलील कुलकर्णी, सुकन्या मोने, सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मराठी कलाविश्वाचे लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडेंनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा : रतन टाटांनी निर्मिती केलेला एकमेव बॉलीवूड चित्रपट कोणता? अमिताभ बच्चन होते प्रमुख भूमिकेत; बॉक्स ऑफिसवर ठरलेला फ्लॉप

प्रवीण तरडेंची पोस्ट

“काही माणसांचं नुसतं असणं सुध्दा कित्येकांना जगण्याचं, लढण्याचं बळ देतं .. आज ते कित्येकजण पोरके झाले.. तुमच्यासाठी श्रध्दांजली हा शब्द लिहू शकत नाही मला माफ करा” अशी पोस्ट शेअर करत प्रवीण तरडेंनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, रतन टाटा जरी आज आपल्याला सोडून गेले असले तरीही त्यांचे आदर्श विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहणार आहेत. सर्वच क्षेत्रातील मंडळींसाठी रतन टाटा ( Ratan Tata ) हे एक प्रेरणास्थान आहेत.

हेही वाचा : Video: जर्मनीत कॉन्सर्ट सुरू असताना रतन टाटांच्या निधनाबद्दल कळालं अन्…; दिलजीत दोसांझच्या कृतीचं होतंय कौतुक

हेही वाचा : “एखाद्याला निरोप देताना सहज ‘टा-टा’ म्हणतो…”, रतन टाटांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात हळहळ, मराठी कलाकारांच्या भावुक पोस्ट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रतन टाटांची ( Ratan Tata ) प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज ( १० ऑक्टोबर ) दुपारी ३.३० वाजता वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.