Ratan Tata Passes Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशसेवा, साधं राहणीमान आणि सामाजिक जाणीवा जपणारे उद्योगपती म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आपण या समाजाचं देणं लागतो या विचारातून रतन टाटांनी समाजिक कार्यात मोठं योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यावर सगळेच हळहळले आहेत. सामान्य लोकांपासून, राजकीय क्षेत्रातील मान्यवर ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे.
कुशल बद्रिके, सिद्धार्थ चांदेकर, प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन, सलील कुलकर्णी, सुकन्या मोने, सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मराठी कलाविश्वाचे लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडेंनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रवीण तरडेंची पोस्ट
“काही माणसांचं नुसतं असणं सुध्दा कित्येकांना जगण्याचं, लढण्याचं बळ देतं .. आज ते कित्येकजण पोरके झाले.. तुमच्यासाठी श्रध्दांजली हा शब्द लिहू शकत नाही मला माफ करा” अशी पोस्ट शेअर करत प्रवीण तरडेंनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, रतन टाटा जरी आज आपल्याला सोडून गेले असले तरीही त्यांचे आदर्श विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहणार आहेत. सर्वच क्षेत्रातील मंडळींसाठी रतन टाटा ( Ratan Tata ) हे एक प्रेरणास्थान आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रतन टाटांची ( Ratan Tata ) प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज ( १० ऑक्टोबर ) दुपारी ३.३० वाजता वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.