ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले. घरातून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या मते तीन दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं असावं. यासंदर्भात हाऊसकिपिंग करणाऱ्या आदिका वारिंगे यांनी अखेरचं रवींद्र महाजनींना कधी पाहिलं होतं, याबाबत माहिती दिली आहे.
“मी स्मार्ट आहे, पण बाबा…”, देखण्या रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरने केलेलं वक्तव्य
आदिका वारिंगे म्हणाल्या, “मी हाऊसकिपिंगचं काम करायचे, नेहमी मी त्यांच्याकडून कचरा घ्यायला यायचे. मी मंगळवारी त्यांना कचरा देताना शेवटचं पाहिलं होतं, नंतर त्यांना पाहिलं नाही. ते कचरा देताना माझ्याशी बोलायचे. काल इथे वास येऊ लागला. तेव्हा मला स्वच्छ करायला सांगण्यात आलं. मी तिथे पोहोचल्यावर त्यांच्या घरातून वास येत होता. मी दार वाजवलं पण कोणी दार उघडलं नाही. त्यानंतर मी माझ्या सरांना माहिती दिली.”
“आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”
पुढे त्या म्हणाल्या, “गुरुवारी मी आले होते, पण कचरा बाहेर ठेवलेला नव्हता, त्यामुळे ते झोपले असावेत, असं मला वाटलं आणि मी निघून गेले. कालही त्यांनी दार उघडलं नाही, त्यामुळे मी निघून गेले.” दरम्यान, घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि घडलेला प्रकार उघडकीस आला. आदिका वारिंगे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रवींद्र महाजनींचा मृत्यू मंगळवारी झाला असू शकतो.