वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनाला दोन आठवडे झाल्यानंतर गश्मीरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी चाहत्यांनी त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल व कामाबद्दल प्रश्न विचारले. चाहत्यांनी त्याला दिवंगत रवींद्र महाजनीबद्दलही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली.
वडिलांच्या निधनानंतर आई त्या दुःखातून सावरत असल्याचं गश्मीर चाहत्याच्या प्रश्नावर म्हणाला.
‘तू शुटिंग पुन्हा सुरू केलंय का?’ असं विचारणाऱ्या चाहत्याला गश्मीर म्हणाला, “नाही. माझ्या आईची प्रकृती स्थिर झाल्यावर लवकरच मी शुटिंग सुरू करेन.”
दरम्यान, रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात बंद फ्लॅटमध्ये आढळला होता. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यांचे निधन झाल्याचं कळालं.