मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाटच आली आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘हर हर महादेव’ या चित्रपटानंतर आता अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रावरंभा’ असं चित्रपटाचं नाव असून पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘रावरंभा’ चित्रपटाची कथा कशावर आधारित असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटातील स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतावराव गुजर यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात प्रतापराव गुजर यांची भूमिका मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अशोक समर्थ साकारताना दिसणार आहेत. सध्या ते ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशोक समर्थ यांनी चित्रपटाचं पहिलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.
हेही वाचा>> Video: भर पार्टीत ‘दिल ले गयी’ गाण्यावर बेभान होऊन नाचली करिश्मा कपूर, उपस्थितही तिच्याकडेच बघत राहिले अन्…
चित्रपटाच्या पोस्टरवर “निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते” असे लिहिले आहे. पोस्टरवर सरसेनापती प्रतापराव गुजर हे युद्धभूमीवर चारही बाजूंनी शत्रूने घेरलेले दिसत आहेत. या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा >> ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट; कारण ठरतंय चर्चेचा विषय
‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार प्रोडक्शनने केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे. ७ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.