लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली. आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

गेले अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट आधी जून महिन्यात प्रदर्शित होणार होता. एक पोस्टर शेअर करून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या टीझरमधून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. तर आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

आणखी वाचा : Video: विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराबद्दल अजय पुरकर यांचा मोठा निर्णय, व्हिडीओवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि या चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटाचं नवीन पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांची झलक दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत टीमने लिहिलं, “शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत…हर हर महादेव !! अजय पुरकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत…” हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

हेही वाचा : “‘सुभेदार’ जूनमध्ये येणार होता ना?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाले…

या पोस्टवर कमेंट करत आता नेटकरी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त करत आहेत. या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर दाखवलेला पराक्रम मोठ्या पडद्यावरून उलगडला जाणार आहे.

Story img Loader