अभिनेत्री रिंकू राजगुरुने ‘सैराट’ सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिच्या पहिल्याच सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांनतर तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झिम्मा २’ या मराठीत सिनेमांत काम केले तर ‘२०० हल्ला हो’ (२०२१), ‘अनकहीं कहाँनिया’ (२०२१), ‘झुंड’ (२०२२), या हिंदी सिनेमांत काम केले. रिंकूने ‘मनसू मल्लिगे’ या सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकमध्ये काम केले असून विविध भाषांत काम करून तिने स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्याची एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.

रिंकूच्या या सिनेमाचे नाव ‘आशा’ असे असून यात रिंकू एका आशा सेविकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. रिंकूने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. यासह रिंकूने या सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. रिंकू या पोस्टरमध्ये आशा सेविकेच्या पेहरावात दिसत आहे. रिंकूने पोस्ट शेअर करत लिहिले, “नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही! तुमच्याबरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे! आमचा ‘आशा’ चित्रपट प्रतिष्ठित ‘२१ व्या थर्ड आय एशियन’ चित्रपट महोत्सवाच्या ‘स्पर्धा’ विभागासाठी अधिकृतपणे निवडला गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो!”

हेही वाचा…साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर

रिंकूच्या या पोस्टवर सेलिब्रिटीज आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने “अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीने “सुपर्ब” अशी कमेंट करून रिंकूचे अभिनंदन केले आहे. एका नेटीझनने “थँक्यू मॅम तुम्ही आशा सेविकेची भूमिका करताय मी सुद्धा एक आशा सेविका आहे तुम्ही ही भूमिका करत आहात हे पाहून खूप छान वाटलं” अशी कमेंट केली. तर आणखी एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले, “आशा सेविकांनी ग्रामीण भारतात सार्वजनिक आरोग्याला एक नवीन परिभाषा दिली आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत आणण्यासाठी अशा चित्रपटांची नितांत आवश्यकता आहे, कारण बॉलीवूड प्रोपगंडा निर्मितीत व्यस्त आहे. मराठी इंडस्ट्रीने ही जबाबदारी घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. या चित्रपटासाठी उत्सुक आहे. शुभेच्छा!”

rinku rajguru fan reacted on her new movie post
रिंकूच्या ‘आशा’ सिनेमाची प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झाल्याने तिच्या पोस्टवर सेलिब्रिटीज आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे.(Photo – Rinku Rajguru Instagram)
fans reacted rinku rajguru new post of movie
रिंकूने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या नव्या सिनेमाची प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झाल्याची माहिती दिली असून तिच्या चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. (Photo – Rinku Rajguru Instagram)

हेही वाचा…Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

आशा चित्रपटात रिंकु राजगुरूसह शुभांगी भुजबळ, उषा नाईक, सुहास शिरसाठ, दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बाळू पाटील यांनी केले असून दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Story img Loader