Sairat Fame Rinku Rajguru First New Car : मराठी कलाविश्वात ‘सैराट’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु आता महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय आहे. रिंकूला ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ या नावाने देखील ओळखलं जातं. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करत रिंकूने माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू राजगुरुने तिच्या आयुष्यातील पहिली गाडी नुकतीच खरेदी केली आहे. या आलिशान गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी नव्या गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये आता रिंकूचं नाव देखील जोडलं गेलं आहे.

हेही वाचा : प्रभासच्या ‘Kalki : 2898AD’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ३१ व्या दिवशीदेखील यशस्वी घोडदौड; शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला टाकणार मागे?

नव्या गाडीसाठी खास कॅप्शन ( Rinku Rajguru )

नव्या गाडीबरोबरचे फोटो शेअर करत रिंकू लिहिते, “पहिली गाडी ही कायम खास असते… हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते… जी तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे.”

अभिनेत्री रिंकू राजगुरु ( Rinku Rajguru )

नव्या गाडीबरोबर रिंकूचं हटके फोटोशूट

पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाडीबरोबर रिंकूने ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे. रिंकूने नवीन गाडी खरेदी केल्याचं समजताच तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नील जोशी, छाया कदम, ऋतुजा बागवे, सायली संजीव, प्रार्थना बेहेरे, किशोर शहाणे, श्वेता रंजन यांनी कमेंट्स करत रिंकूवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video : कॅमेरे पाहताच खुदकन हसली अन्…; रणबीर- आलियाच्या लेकीचा गोड अंदाज! राहाला पाहून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा : मिसेस कपूर होण्याआधी आलियाने सोडलेली ‘ती’ सवय; रणबीर कपूरने बायकोबद्दल केला खुलासा; म्हणाला, “वयाची ३० वर्षे…”

दरम्यान, रिंकू राजगुरु ( Rinku Rajguru ) शेवटची ‘झिम्मा २’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने साकारलेल्या तानिया या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. तिच्यासह या चित्रपटात शिवानी सुर्वे, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सायली संजीव व सिद्धार्थ चांदेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा बक्कळ कमाई केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru bought first new luxurious car shares photos with emotional caption sva 00
Show comments