‘सैराट’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरूचा मोठा चाहतावर्ग आहे. रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. त्या कार्यक्रमातील फोटोही ती शेअर करत असते. यावेळी रिंकूने नाही तर भाजपा खासदाराच्या चिरंजीवांनी तिच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे कृष्णराज यांचा ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूबरोबरचा फोटो होय. कृष्णराज यांनी रिंकूबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, तो फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोटोमध्ये कृष्णराज महाडिक व रिंकू राजगुरू श्री महालक्ष्मी मंदिराबाहेर उभे असलेले दिसत आहेत. “आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,” असं कॅप्शन या फोटोला कृष्णराज महाडिक यांनी दिलं आहे.

पाहा फोटो –

कृष्णराज महाडिक हे युट्यूबर व उद्योजक आहेत. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो, व्हिडीओ व व्लॉग शेअर करत असतात. नुकताच त्यांनी रिंकू राजगुरूबरोबरचा एक फोटो पोस्ट केला, त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरी या फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

नेटकऱ्यांनी कृष्णराज यांचा रिंकूबरोबरच्या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर, ‘साहेबांना नाहीतर आईंना पाठवा हा फोटो जरा कोणी तरी’ अशी मजेशीर कमेंटही या फोटोवर पाहायला मिळत आहे. एका युजरने कृष्णराज यांना दमदार आमदार म्हटलं आहे. ‘भावा विषय संपला’, ‘सैराट झालं जी…’, ‘विचार करायला हरकत नाही’, अशा आशयाच्या कमेंट्सही या फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू महोत्सवा’साठी गेली होती. त्यानंतर ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाला गेली होती. त्याचवेळी कृष्णराज महाडिक दर्शनासाठी मंदिरात आले होते. त्या भेटीदरम्यान त्यांनी फोटो काढला. तोच फोटो कृष्णा महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला, अशी माहिती समोर आली आहे.