नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरु आता आघाडीची अभिनेत्री झाली आहे. नवनवीन चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकेत रिंकू दिसत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात तिने साकारलेली तानिया प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. अशी ही प्रेक्षकांची मनं जिंकणारी रिंकू नुकतीच बॉलीवूड सुपरस्टारच्या कुटुंबाला भेटली. याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट, व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदाच्या कुटुंबियांबरोबर ती दिसत आहे.

Rishi Sunak's Post From Wankhede Features Father-In-Law Narayana Murthy Google trends
PHOTO: ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सासरे नारायण मूर्तींसोबतचा सेल्फी व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
shazahn padamsee got engaged to Ashish Kanakia
बॉलीवूड अभिनेत्रीने ३७ व्या वर्षी ‘या’ कंपनीच्या CEO बरोबर गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो पाहिलेत का?
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…

हेही वाचा – Video: ‘जाऊ बाई गावात’ची विजेती रमशा फारुकी झळकली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत, पाहा व्हिडीओ

रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा, मुलगा यशवर्धन, मुलगी टीना दिसत आहे. गोविंदाच्या पत्नी रिंकूला घट्ट मिठी मारून फोटो काढताना पाहायला मिलत आहे. हा फोटो शेअर करत रिंकूने लिहिलं आहे, “बऱ्याच दिवसांनी भेटले.”

हेही वाचा – ‘या’ चिमुकलीला ओळखा पाहू? आहे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘सैराट’ या चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.

Story img Loader