मराठी चित्रपट ‘झिम्मा’चा दुसरा भाग २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. ‘झिम्मा’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेने दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. ‘झिम्मा २’ ला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. चित्रपटाने यशस्वीरित्या सिनेमागृहात आठवडा पूर्ण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झिम्मा’मध्ये सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सायली संजीव, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले हे कलाकार होते. तर ‘झिम्मा २’मध्ये आधीचेच सर्व कलाकार आहेत. फक्त सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले यांच्या जागी शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू यांना घेण्यात आलं आहे. या चित्रपटाबद्दल रिंकूने केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.

Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

रिंकूने या टीममधील सर्वांबरोबर फोटो शेअर केले आहेत. “काय बोलू मी या यांच्याबद्दल, या प्रवासात मी नवीन आहे असं मला आजवर कधी जाणवलं नाही. या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी, पण या इवलुश्या जिवाला या सगळ्यांनी अगदी अलगदपणे सामावून घेतलं आपलंसं केलं.तुम्हा सर्वांकडून खुप शिकले या प्रवासात. खुप सुंदर गोष्टी अनुभवायला मिळाल्या. या सगळ्यासाठी सर्वांना खूप खूप थँक्यू. खूप प्रेम. हेमंत दादा थँक्यू तू मला ही संधी दिलीस,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

दरम्यान, रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर क्षिती जोग, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru post for jhimma 2 cast siddharth chandekar hemant dhiome suchitra bandekar others hrc