अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)ने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण तयार केले आहे. ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू घराघरात पोहचली आहे. या चित्रपटातील ‘आर्ची’ या भूमिकेचा आजही चाहतावर्ग आहे. आता मात्र एका मुलाखतीदरम्यान तिने वाचून दाखवलेल्या कवितेमुळे ती मोठ्या चर्चेत आली आहे.

रिंकू राजगुरूने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने बालपण, शाळा, घर, आई-वडिल यांच्याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये आठवणींना उजाळा दिला आहे.

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Marathi writer actress Madhugandha Kulkarni post viral
“ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

तू अकलूजला गेल्यावर मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जातेस का? त्यांच्याबरोबर वेळ घालवतेस का? या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणते, मला फार मित्र मैत्रीणी नाहीत. कारण चौथीनंतर ज्या शाळेत मी गेले ती मुलींची शाळा होती. तिथे ओळखीच्या म्हणू शकू, अशा २-३ काही मैत्रीणी झाल्या. पण मी जिला जवळची मैत्रीण म्हणायचे, ते पुढे समजलं की आपण त्यांना बेस्ट फ्रेंड म्हूणू शकत नाही.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला प्रेमात मिळालेला धोका, निक्की तांबोळीला सांगत म्हणाला, “माझ्याबरोबर चांगली असायची पण…”

अनेकवेळा मला असं जाणवलं की स्वार्थासाठी मैत्री होतेय. मला तशी मैत्री आवडत नाही. मी अतिविचार करणारी, भावनिक स्वभावाची मुलगी आहे. मला अशा गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे मी फार कोणाच्या जवळ जात नाही. माझी एक मैत्रीण आहे, तीच माझं कामदेखील बघते. आई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. मी तिला सगळं सांगते. एखाद्याशी मैत्री केली मी पुढच्या व्यक्तीला पूर्ण शरण जाते. त्यामुळे मैत्री करताना मी विचार करते.” असे रिंकूने म्हटले आहे.

काय म्हणाली रिंकू?

तुझे फार मित्र-मैत्रीणी नाहीत, मग तू लिहितेस का? या प्रश्नाला उत्तर देताना तिने म्हटले, मी आधी लिहायचे. काही दिवसांपूर्वी लिहणं बंद केलं. असे तीने म्हटले. तू लिहिलेलं काही वाचून दाखवू शकतेस का? यावर रिंकूने ‘कमरा’ नावाची एक कविता वाचून दाखविली.

ती अशी, “जब वो नहीं होता है, तब वह खाली कमरा बहुत कुछ कहता है, शायद उसके ना होने की एक वजह होगी की उसे मै महसूस करूँ, अपने अंदर झाक कर देखू तो वहीं होता हैं, मेरे भीतर सिर्फ किसी और के साथ, उसने शायद खो दिया मुझे अब, लेकीन मैं अभी भी खुद को पाती हूँ उसके साथ, उसकी झूठी दुनिया में, उसकी झूठी दुनिया में खुदको पाना, क्या सच्चाई हैं मेरी? आज भी उस खाली कमरो को देख के उसको महसूस करना, क्या अच्छाई है मेरी?” ही कविता काही वर्षापूर्वी लिहिल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.

दरम्यान, ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली होती