कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे, तर कधी त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री रिंकू राजगुरूने एका मुलाखतीदरम्यान, ती स्वत:च्या आई-वडिलांपासून लपवून कोणती गोष्ट करायची याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान गप्पा मारताना तिने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. बालपणाच्या आठवणी, आई-वडील, तिची दिनचर्या आणि प्राण्यांबद्दल तिचे असलेले प्रेम याबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
आई-वडिलांपासून लपून ‘हे’ काम करायची रिंकू राजगुरू
‘व्हायफळ’ पॉडकास्टमध्ये बोलताना रिंकूने प्राण्यांबद्दल तिला खूप प्रेम वाटत असल्याचे म्हटले आहे. ती सांगते, “शाळेत तिला घरच्यांनी सायकल घेऊन दिली होती. त्या सायकलला पुढे बास्केट होते, त्यात मी दफ्तर ठेवायचे. कधी पाठीमागे ठेवायचे. माझ्या सायकलच्या बास्केटमध्ये जास्त श्वान व मांजरंच होती. मला प्राणी खूप आवडतात. मला शाळेतून येताना श्वानाचं पिल्लू कुठेही दिसलं किंवा मांजराच्या पिल्लांचा आवाज आला तर मी शोधायचे, बास्केटमध्ये ठेवायचे, घरी आणायचे. घरी आणल्यानंतर लपवायचे. रात्री आईला त्या पिल्लांच्या ओरडण्याचा आवाज यायचा. मग मी तिला म्हणायचे की, आपण यांना पाळुया. नंतर नंतर ही गोष्ट वडिलांना समजली होती”, अशी आठवण तिने सांगितली आहे.
याबरोबरच रिंकू प्राण्यांना नावे द्यायची का? यावर उत्तर देताना तिने हो म्हणत, तिने पाळलेल्या पहिल्या श्वानाचे नाव गब्बर ठेवले होते. मग मोती, शेरु अशी नावे दिली होती. तर सध्या तिच्या घरी असलेल्या श्वानाचे नाव हिटलर ठेवल्याचे तिने सांगितले आहे. याचे कारण म्हणजे तो सगळ्यांवर भूंकत असायचा, म्हणून रिंकूच्या आजीने त्याला हिटलर अशी उपमा दिली होती. मांजरांबद्दल बोलताना ती म्हणते की, आता माझ्याकडे मांजर आहे, तिचे नाव चार्ली असे आहे. घरी आहेत त्यांची नावे टॉम, जॅक अशी आहेत; तर त्यांच्या आईचं नाव मन्या असं आहे, असे रिंकूने सांगितले आहे.
आई-वडिलांना प्राणी पाळलेले चालतात का? या प्रश्नाला उत्तर देताना तिने म्हटले की, आता त्यांनादेखील सवय झाली आहे. आधी ते म्हणायचे की आम्ही पाळणार नाही, त्यांचं काही करणार नाही. पण, आता तेच सगळं करत आहेत.
दरम्यान, रिंकू राजगुरू ही ‘सैराट’ या चित्रपटातून घराघरात पोहचली होती. आर्ची या पात्राचे आजही अनेक चाहते असलेले पाहायला मिळतात.