अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने ‘सैराट’मध्ये आर्चीची भूमिका साकारली आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पहिल्याच चित्रपटातून ती स्टार झाली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजही प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ आहे. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू राजगुरूचा चाहतावर्ग चांगलाच मोठा आहे. तिच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर रिंकूही सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी संपर्कात असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे चाहत्यांशी शेअर करीत असते. आता तिने पोस्ट केलेला एक नवीन व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : “‘घर बंदूक बिरयानी’मध्ये परश्या आहे पण आर्ची का नाही?”; नागराज मंजुळेंनी केला खुलासा, म्हणाले…

‘सैराट’ चित्रपटामध्ये रिंकू बुलेट आणि ट्रॅक्टर चालवताना दिसली. तर या नवीन व्हिडीओमध्ये ती कार चालवताना दिसत आहे. जरीची साडी नेसून, अंगावर पारंपरिक दागिने परिधान करून ती अत्यंत उत्कृष्टपणे आणि आत्मविश्वासाने कार चालवीत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करीत तिने लिहिलं, “डेस्टिनेशन न ठरवताच लॉंग ड्राइव्हला जाऊया.”

हेही वाचा : Video: रिंकू राजगुरुवर फुलांची उधळण, व्हिडीओ पाहून सायली संजीवही फिदा; म्हणाली…

रिंकूचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. तिचा हा पारंपरिक पण डॅशिंग अंदाज पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करीत एका नेटकऱ्याने लिहिलं, “बुलेट, ट्रॅक्टर, कार…आता फक्त विमान चालवायचं राहिलंय.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “अकलूजची क्वीन.” तर आणखी एकाने लिहिलं, “जमलं अगदी ओके मध्ये…” त्यामुळे आता रिंकू या कार ड्रायव्हिंगमुळे चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru shared a video of her driving a car her fans commented on the video rnv