आज महिला दिनानिमित्त सेलिब्रिटी पोस्ट करून शुभेच्छा देत आहेत. अनेकजण त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या महिलांचे फोटो शेअर करत आहेत. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही महिला दिनानिमित्त पोस्ट केली आहे. रिंकूने तिच्या आईबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने शेअर केलेले आईबरोबरचे फोटो खूप चर्चेत आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. रिंकू हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते. तिने तीन फोटो शेअर केले आहेत. यात दोघीही मायलेकींचे वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत. शेवटच्या फोटोत दोघीही मराठी लूकमध्ये दिसत आहेत. “आई, And this world, she is my world,” असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे.
Video: अमृता फडणवीस लेकीसह जामनगरहून परतल्या माघारी, दिविजाचा ग्लॅमरस एअरपोर्ट लूक चर्चेत
रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करून रिंकूची आई खूप तरुण दिसत असल्याचं म्हटलंय. अनेकांनी यावर रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. काही चाहत्यांनी दोघी मायलेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.