१७ वर्षांपूर्वी रतन, मदन आणि चंदन या कुरळे ब्रदर्सच्या तिकडीने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. अभिनेते अशोक सराफ यांनी रतनची भूमिका साकारली होती. तर अभिनेते मकरंद अनासपुरे मदन आणि भरत जाधव चंदनच्या भूमिकेत झळकले होते. आता हेच त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालं आहे. अर्थात ‘साडे माडे ३’ चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. आज चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. याचे फोटो नुकतेच अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ या चित्रपटाची घोषणा ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती. तेव्हापासून चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव झळकणार असल्याचं निश्चित होतं. पण इतर कलाकारांबाबत जाहीर करण्यात आलं नव्हतं. आता या चित्रपटात झळकणारे दोन चेहरे समोर आले आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा – Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली, “वर्षाताईंना अपशब्द वापरले…”

अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसंच अभिनेता संकेत पाठक देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त पार पडल्यानिमित्ताने सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चित्रपटाच्या टीमबरोबर अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक दिसत आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “‘पुन्हा एकदा साडे माडे ३’…’पुन्हा एकदा’ महाराष्ट्रातल्या मेगा सुपरस्टार्सबरोबर काम करायचा योग…अशोक सराफ सर, मकरंद अनासपुरे सर, भरत जाधव सर…’पुन्हा एकदा’ @avkpictures_ अमेय खोपकर सरांबरोबर एसोसिएशन…’पुन्हा एकदा’ जुन्या मित्रांबरोबर नवीन काम…रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक…’पुन्हा एकदा’ संजय जाधव सरांच्या नजरेतून दिसण्याचा योग…’पुन्हा एकदा’ अंकुश चौधरी सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी आणि ‘पुन्हा एकदा’ मायबाप रसिकांना आनंद देण्याचा घेतलेला वसा…खूप आनंदी आणि उत्साही…लवकरच भेटू…”

हेही वाचा – “आमचा छोटा सुपरहिरो आला…”, मायरा झाली मोठी ताई; श्वेता वायकुळ यांनी गोंडस मुलाला दिला जन्म

हेही वाचा – ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेता हरीश दुधाडेने भावुक पोस्ट करत म्हणाला, “गेली तीन वर्ष…”

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेता अंकुश चौधरीचं करणार आहे. तसंच चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव सांभाळणार आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपटाची घोषणा करताना अंकुश चौधरी म्हणाला होता की, ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ची घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणं, हे खरंच खूपच जबाबदारीचे काम असते. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे, ‘साडे माडे ३’वर जसं प्रेक्षकांनी प्रेम केलं, तसंच या चित्रपटावरही करतील. या भागात कुरळे ब्रदर्सची धमाल डबल झाली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru will appear in punha ekda sade made teen movie siddharth jadhav shared photos pps