हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. त्याप्रमाणे आज सर्वत्र गुढीपाडवा साजरा केला जात आहे. घरोघरी गुढ्या उभारल्या जात आहेत. गोडाधोडाचे पदार्थ करून हिंदू नववर्ष साजरं होतं आहे. महाराष्ट्राचं लाडकं कुटुंब म्हणजे देशमुख कुटुंबाची गुढी उभारली आहे. देशमुखाची लाडकी सून, अभिनेत्री जिनिलीया देशमुखने गुढीला सजवतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलीया देशमुखने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख आपल्या लाडक्या मुलांबरोबर रिआन व राहिलासह गुढीला सजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने लिहिलं आहे, “पहाटे आमची गुढी तयार होतं आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.”

हेही वाचा – Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ची वाट पाहताय, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो

एवढंच नाहीतर जिनिलीयाने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत रितेशबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, फ्रेबुवारीमध्ये ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची रितेशने घोषणा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन तो स्वतः करणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जिनिलीया सांभाळणार आहे. २०२५ला ‘राजा शिवाजी’ चित्रपट मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader