अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख ही जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ते दोघेही मजेशीर रिल व्हिडीओ करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आता रितेशने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो सध्या खूप व्हायरल होत आहे.
रितेशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा आणि जिनिलीयाचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘ब्लफमास्टर’ चित्रपटातील अभिषेक बच्चन व नाना पाटेकर यांचा एक सुपरहिट सीन रिक्रिएट केला आहे.
आणखी वाचा : “मराठी चित्रपटांतील विनोदाचा दर्जा…” रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत
या व्हिडीओमध्ये रितेश जिनिलीयावर रागावलेला दिसत असून तो तिला त्याला सॉरी म्हणण्यास सांगत आहे. त्यावर जिनिलीया नाईलाजाने त्याला सॉरी म्हणते. तिने जबरदस्तीने म्हटलेलं आहे सॉरी रितेशला पटत नाही त्यामुळे तो तिला म्हणतो, असं नाही मनापासून सॉरी म्हण. त्यावर जिनिलीया त्याला पुन्हा एकदा सॉरी म्हणते. आपल्या बायकोने आपल्याला सॉरी म्हटल्यावर रितेशला आनंद होतो आणि तो खुर्चीवरून उठून नाचायला लागतो. तर त्याला नाचताना पाहून जिनिलीयाला देखील हसू येतं.
आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आला असून यावर विविध प्रतिक्रिया देत त्यांचा हा मजेशीर अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. याचबरोबर अनेक जण त्यांच्या मधल्या केमिस्ट्रीचंही कौतुक करत आहेत.