रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. चित्रपट प्रदर्शित होऊन १० ते १२ दिवस उलटले आहेत. तरीही चित्रपटाचा बोलबाला अजूनही कायम आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तर रितेशचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला. शिवाय जिनिलीयाचाही हा पहिलाच मराठी चित्रपट. तरीही तिने स्वतःला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून सिद्ध करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली.

‘वेड’ चित्रपटाचं बजेट किती?

आतापर्यंत ‘वेड’ चित्रपटाने ३५ कोटी रुपयांपेक्षाही अधिक कमाई केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? हा चित्रपट बनवण्यासाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. रितेशच्या या चित्रपटाचा बजेट १५ कोटी रुपये इतपत होता असं बोललं जात आहे. म्हणजेच १५ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

आणखी वाचा – ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता चित्रपटाला अधिकाधिक फायदा झाला असल्याचं दिसत आहे. शिवाय या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचीही मान उंचावली आहे. अमृता खानविलकर, रवी जाधव, आदिनाथ कोठारे, क्षितीज पटवर्धन यांसारख्या कित्येक मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळींनी ‘वेड’ला मिळणारा प्रतिसाद पाहून रितेश-जिनिलीयाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia deshmukh ved marathi movie and box office collection see details kmd