अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. ‘वेड’मधील रितेश-जिनिलीयाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याच चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरच्या निमित्ताने खास ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची नोंद करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ अभिनेता रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “शेजारी नक्की काय चाललंय…”, प्रसाद ओकने शेअर केला हास्यजत्रेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ

२० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता सुपरहिट ‘वेड’ चित्रपटाचा प्रीमिअर स्टार प्रवाहवर होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखा विक्रम करण्यात आला आहे. हृदयाच्या आकाराची भव्य कलाकृती साकारून या अनोख्या विक्रमाची नोंद करण्यात आली. यासाठी तब्बल १ हजार ४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आल्याचे रितेश देशमुखने सांगितले. याच अनोख्या विक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘गदर २’मधील ‘तो’ सीन पाहून कार्तिक आर्यनने चित्रपटगृहात केला जल्लोष! व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तारा सिंगचा चाहता…”

‘वेड’ चित्रपटाची टीम आणि स्टार प्रवाह वाहनीने छत्र्यांची आकर्षक हृदयाच्या आकारात मांडणी करुन हा रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणतो, “अभिमानाचा क्षण…मराठी चित्रपट सृष्टीत हे पहिल्यांदाच घडतंय आणि याच मराठी चित्रपट सृष्टीचा भाग असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.” तसेच “आमच्या चित्रपटाला तुम्ही जसे सिनेमागृहांत प्रेम दिलेत तसाच प्रतिसाद २० ऑगस्टला होणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरला सुद्धा द्या” असे आवाहन रितेश देशमुखने त्याच्या चाहत्यांना केले आहे.

हेही वाचा : “ते बालगुन्हेगार ढसाढसा रडले…”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला शिवराज अष्टक मालिकेचा अनुभव; म्हणाले, “त्या मुलांनी गुन्हेगारी…”

दरम्यान, ‘वेड’ चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलियासह अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वेड’ चित्रपटगृहात ३० डिसेंबर २०२२ रोजी, तर ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर २८ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित करण्यात आला.