अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची जोडी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. ‘वेड’समोर बॉलीवूडचे भलभले चित्रपट फ्लॉप ठरले. दरम्यान, ‘वेड’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी अभिनेता रितेश देशमुखने आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा : “ऑनस्क्रीन किसिंग सीन शूट करताना…”, चित्रपटातील भूमिकांविषयी जिनिलीया देशमुखने मांडलं स्पष्ट मत

pushkar jog angry over ranveer allahbadia controversial statement
“त्या शोमध्ये अश्लील, अचरटपणा…”, समय रैनावर मराठी अभिनेता भडकला! रणवीर अलाहाबादियाबद्दल म्हणाला, “ही कॉमेडी…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
tharla tar mag arjun and sayali haldi ceremony
ठरलं तर मग : ‘या’ दोन व्यक्तींमुळे सायलीला लागणार अर्जुनची उष्टी हळद! काय आहे नवीन प्लॅन? पाहा प्रोमो…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
paaru fame Sharayu Sonawane And Shweta Kharat Dance on shahid Kapoor song Saree Ke Fall Sa
Video: पारू आणि अनुष्काचा शाहिद कपूर-सोनाक्षी सिन्हाच्या सुपरहिट गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो

रिजेश-जिनिलीयाचा हा गाजलेला चित्रपट पहिल्यांदाच टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे. रितशने यासंदर्भात इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘वेड’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ शो २० ऑगस्टला असणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रेक्षकांना संध्याकाळी ७ वाजता या चित्रपटाचा आनंद घेता येईल.

हेही वाचा : “रेड लिपस्टिक लावायला घाबरायचे”, कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “शोमध्ये माझ्या ओठांची…”

चित्रपटगृह आणि ओटीटीनंतर ‘वेड’ टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे जिनिलीयाने प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामुळे अभिनेत्रीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत ७५ कोटींहून अधिक कमाई करणारा ‘सैराट’नंतर हा दुसरा चित्रपट ठरला.

हेही वाचा : पावसाळ्यात निवेदिता सराफ यांना करायला आवडतं ‘हे’ काम; म्हणाल्या, “पहाटे पाच वाजता उठून…”

दरम्यान, ‘वेड’ चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलियासह अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वेड’ चित्रपटगृहात ३० डिसेंबर २०२२ रोजी, तर ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर २८ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित करण्यात आला.

Story img Loader