बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा या दोघांनी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांत काम केले आहे. रितेशने अभिनयक्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट रितेशने दिले. रितेश फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित राहिला नाही. त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. ‘लय भारी’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट. आता रितेशने नवी सुरुवात केली आहे. त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच वर्षी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असल्याची बातमी दिली होती. त्याच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. शिवाय रितेश मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याने चित्रपटप्रेमी खूपच खुश होते. आता प्रेक्षकांसाठी रितेश दिवाळीनिमित्त खास भेट घेऊन आला आहे.

आणखी वाचा : Photos : ‘बिग बॉस’च्या इतिहासात सर्वाधिक मानधन मिळालेले स्पर्धक कोणते? आजही होते चर्चा

रितेशने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. दिवाळी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर हे पोस्टर रिलीज करताना फार आनंद होत असल्याचंही रितेशने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. पोस्टरवरुन हा चित्रपट प्रेम कहाणी आणि थ्रिलर या पठडीतला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या नवीन चित्रपटाच्या फर्स्ट लूकला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत दिसणार असून रितेश याचं दिग्दर्शन करणार आहे. याबरोबरच बॉलिवूडचा दबंग सलमान खानही यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सलमान रितेशच्या ‘लय भारी’मध्येही छोट्याश्या भूमिकेत दिसला होता. रितेश जेनीलियाचा हा ‘वेड’ ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia desouza starrer first marathi movie ved poster launch avn