रितेश देशमुखने शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित एका नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल अभिनेत्याने खास पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वेड’च्या यशानंतर आता रितेश देशमुख आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव ‘राजा शिवाजी’ असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

हेही वाचा : जॅकी-रकुल प्रीतची लगीनघाई! मेहुण्याच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचले आमदार धिरज देशमुख, पाहा Video

रितेश देशमुखची पोस्ट

इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.

शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सीमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं…आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे…’राजा शिवाजी’

हेही वाचा : ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ मध्ये कोणी मारली बाजी? कोणाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार? वाचा

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहे. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh announce raja shivaji historical movie on the occasion of shivjayanti sva 00
First published on: 19-02-2024 at 10:09 IST