मागच्या दीड वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात झालेली उलथापालथ आपण सर्वांनी पाहिली. राज्यातील राजकारणात झालेले बदल आश्चर्यकारक होते. शिवाय राज्याने तीन वर्षांच्या कार्यकाळात राजकीय भूकंपानंतर दोन मुख्यमंत्रीही पाहिले. याच राजकीय परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने उत्तर दिलं आहे.

जिनिलीया नव्हे तर ‘हे’ आहे रितेश देशमुखचे पहिलं प्रेम, म्हणाला “ते पूर्ण व्हावं अशी…”

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Radhakrishna Vikhe Patil Said This Thing About Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!

‘मुंबई तक’च्या एका कार्यक्रमाला रितेश देशमुखने हजेरी लावली. यावेळी राजकारणाबद्दल त्याला प्रश्न विचारला असता, राजकारणात येण्याची आपली कोणतीच इच्छा नाही, असं त्याने सांगितलं. २०२४ च्या निवडणुकीत तुला निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्यास तू ती स्वीकारशील का, असा प्रश्न विचारल्यावर रितेशने नकार दिला. रितेशचे दोन्ही भाऊ आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मी निवडणुकीचा प्रचार करतोच, असंही तो म्हणाला.

Video: गोष्ट पडद्यामागची – शरद पवारांनी ‘या’ नाटकात तर, पूनम महाजन यांनी मराठी चित्रपटात केलंय काम

राजकारण सोपं आहे की चित्रपट करणं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रितेश म्हणाला, मला २० वर्षांत इतकं तरी नक्कीच कळलंय की चित्रपटाचा स्क्रीन-प्ले लिहिणं अतिशय सोपं आहे. सध्या दीड वर्षात जे झालंय तो स्क्रीन-प्ले लेखकही लिहू शकत नाही. कितीही विचार केला, तरी आता जे आपण पाहतोय, तो विचार करण शक्यच नाही. जर दोन वर्षांपूर्वी कोणीतरी माझ्याकडे अशी स्क्रीप्ट घेऊन आलं असतं आणि ‘राजकारणाबद्दल चित्रपट बनवायचा आहे व हा स्क्रीन-प्ले आहे’, असं म्हटलं असतं तर हे थोडी शक्य आहे, असं होऊ शकतं का? असं मी विचारलं असतं. जे काही घडलं, त्यावर नक्कीच चित्रपट होऊ शकतो,” असं रितेश म्हणाला. रितेशने केलेलं वक्तव्य हे एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन बंडखोरी केली, त्याला उद्देशून होतं.