बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखला जातो. लवकरच त्याचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील दोन गाणी लोकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान थिरकला आहे. आता याच गाण्यावर शाहिद कपूरला डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
रितेशच्या ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमात नुकतीच शाहिद कपूरने हजेरी लावली आहे. तेव्हा या दोघांनी ‘वेड लावलंय’ या गाण्यावर डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये रितेश शाहिदला या गाण्याच्या स्टेप्स समजावून सांगत आहे. रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा डान्सचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
दरम्यान ‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेश देशमुख हा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया दिसणार आहे. अजय अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिल आहे, तर शाहिद कपूर नुकताच ‘जर्सी’ चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटात दिसणार आहे.