एखादा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रिन्स न मिळणं हा मुद्दा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. मराठी चित्रपटांना प्राईम टाइम शो व स्क्रिन्स मिळत नाहीत याबाबत अनेक चर्चाही रंगतात. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी असंच काहीसं घडलं. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला शाहरुखच्या चित्रपटाचा फटका बसणार असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’च्या विजेतेपदासाठी तू योग्य नाही म्हणणाऱ्यांना एमसी स्टॅनचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “जे लोक जळतात…”

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्याचबरोबरीने रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जात होते. अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला.

‘वेड’ प्रदर्शित होऊन ४५ दिवस उलटले आहेत. तरीही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई खरंच कौतुकास्पद आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कोटी कमावले याबाबत रितेशने एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी सांगितली आहे.

आणखी वाचा – Video : …अन् नागपूर विमानतळावरील ‘ते’ दृश्य पाहून शिव ठाकरेही थक्क झाला, नेमकं घडलं तरी काय?

देशभरात या चित्रपटाने आतापर्यंत ७३ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दिड महिना उलटल्यानंतरही ‘वेड’ करत असलेली कमाई पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा चित्रपट आता १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठणार का? हे पाहावं लागेल.