रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील बोलबाला कायम आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करायला सुरुवात केली. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सत्या व श्रावणीची एक अनोखी लव्ह स्टोरी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निशाच्या अखंड प्रेमात बुडालेल्या सत्यावर निस्वार्थ प्रेम करणारी श्रावणी प्रेक्षकांना विशेष भावली. अखेर श्रावणीच्या प्रेमाची खरी किंमत सत्याला कळली. आणि त्याने त्याच्या मनातील श्रावणीबद्दलच्या भावना तिला बोलून दाखवल्या. पण यानंतर श्रावणी व सत्याचं काय झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत आता खुद्द रितेशनेच खुलासा केला आहे.

Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष
Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर येताच धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया, “खंडणी, खुनातले आरोपी एकच, सगळ्यांना..”
Anjali Damania Demand
Anjali Damania : व्हायरल फुटेजनंतर अंजली दमानियांची मागणी, “राजेश पाटील यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि…”
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

हेही वाचा>> जेव्हा विवस्त्र होत समुद्रकिनाऱ्यावर धावली होती प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी; पब्लिसिटी स्टंटमुळे मोडला होता संसार

रितेश देशमुखमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश चित्रपटातील त्याचा मित्र जॉन्टीची भूमिका साकारणारा अभिनेता शुभंकर तावडे याच्याबरोबर दिसत आहे. “सत्या व श्रावणीचं पुढे काय झालं?”, या शुंभकरने विचारलेल्या प्रश्नावर रितेश उत्तर देत म्हणाला “ते आनंदी आयुष्य जगत आहेत”. पण या चित्रपटात सत्या व श्रावणीचं एकही रोमॅंटिक गाणं नसल्याची खंत शुभंकरने व्यक्त केली. यावर उत्तर देताना रितेशने ‘वेड’ चित्रपटातील एका नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा>> “’वेड’ या सिनेमाने…”, रितेश देशमुखच्या चित्रपटाबाबत तेजस्विनी पंडितचं मोठं विधान

हेही पाहा>> …अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो

‘वेड’ चित्रपटात रितेश व जिनिलीया यांनी साकारलेल्या सत्या व श्रावणी या पात्रांचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे एक रोमॅंटिक गाणं असणार आहे. चित्रपटाप्रमाणेच वेड चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘सुख कळले’, ‘वेड लावलंय’ या गाण्यांवर सोशल मीडियावर रील्स व्हायरल होत आहेत. आता सत्या व श्रावणीच्या नवीन गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Story img Loader