रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मराठी चित्रपट ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १९ दिवस झाले आहे, पण चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे. चित्रपटाने सोमवारपर्यंत तब्बल ४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रितेश आणि जिनिलीया पोस्ट शेअर करत चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत आहेत.

जिनिलीया मंगळवारी उशीरा एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये वेड चित्रपटातील एक पोस्टर आहे आणि त्यावर बॉक्स ऑफिसची आकडेवारी दिली आहे. १८ व्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाने १.४ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.१८ कोटी रुपयांची कमाई केली आणि दुसऱ्या आठवड्यात २०.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण ४८.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. “तुम्ही भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद” असं कॅप्शन देत जिनिलीयाने पोस्ट शेअर केली आहे.

shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
Geo Studios Stree 2 movie Oscar Entertainment news
जिओ स्टुडिओजला नवी झळाळी…नव्या वर्षात रंजक चित्रपटांसह सज्ज

कोट्यवधी रुपयांच्या कमाईनंतर ‘वेड’चा दुसरा भाग येणार? रितेश देशमुख म्हणाला, “चित्रपटाचा…”

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी ठरला आहे आणि सातत्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम रचत आहे. चित्रपटातील वेड लावलंय गाण्याचीही अनेकांना भुरळ पडली आहे. हे गाणं ट्रेंड करतंय. सध्याची आकडेवारी पाहता चित्रपट लवकरच ५० कोटींचा आकडा गाठेल, असं दिसतंय.

लग्नाच्या ६ वर्षांनंतर जावेद अख्तर पडलेले शबाना यांच्या प्रेमात, अफेअरबद्दल कळताच ‘अशी’ होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. तर रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

Story img Loader